Home बीड नगर रोडवरील विद्युत तार तुटली आणि वाहतूक झाली ठप्प!

नगर रोडवरील विद्युत तार तुटली आणि वाहतूक झाली ठप्प!

60
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड : दुपारच्या सुमारास भरधाव वेगात वाहणारा नगर रोड क्षणांमध्ये ठप्प झाला. एका भरगच्च भरलेल्या उसाच्या ट्रकची विद्युत प्रवाह वाहतूक करणाऱ्या तारेला टक्कर झाल्याने सदरील तार तुटून नगर रोडवरील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्यावर पडल्याने तब्बल अर्धा घंटा रहदारी बंद झाली होती.
आज सकाळपासूनच बीड शहरातील विविध भागातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. असे असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील नगर रोडवरील जिल्हा न्यायालय समोरील एका विद्युत प्रवाह करणाऱ्या तार्‍याला ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने सदरील विद्युत प्रवाह करणारी तार रस्त्यावर तुटून पडली. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा न्यायालयातील सुरक्षा रक्षक आणि अन्य नागरिक यांनी दुतर्फा होणारी वाहतूक क्षणार्धात बंद केली. तब्बल अर्ध्या तासानंतर विद्युत महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदरील तार तोडण्यात आली. आणि त्यानंतर नगर रोडवरील वाहतूक सुरक्षितपणे पुन्हा सुरू झाली. यावेळी जिल्हा न्यायालयातील सुरक्षारक्षक सोबतच वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने कोणतीही आणि झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here