Marathwada Sathi

‘खडसेंनी भाजप सोडणं धक्कादायक, पक्षासाठी चिंतनाची बाब’, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप नेत्यांना धक्का

खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फायनली भाजपला रामराम ठोकला आहे.

खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी असून ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, असं नेत्यांनी म्हटलंय.

मुंबई : खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी फायनली भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  दरम्यान खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी असून ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर खडसेंचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. तर मी यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

YouTube player


एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील यांनी नमूद केलं.

Exit mobile version