Marathwada Sathi

रोज ४० अंडे खाऊन बनवल पिळदार शरीर…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबती. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका साकारत राणाने अनेकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी राणाने अथक परिश्रम केले होते. सलग ८ तास जीममध्ये घाम गाळल्यानंतर आणि योग्य डाएट केल्यानंतर राणाला भल्लालदेव ही भूमिका साकारणं शक्य झालं.भल्लालदेव या भूमिकेला न्याय देण्यासाठी राणाला चांगलीच मेहनत घ्यावी लागली. केवळ अभिनयच नव्हे तर त्याने त्याच्या शरीरयष्टीत व आहारातही अमुलाग्र बदल केला होता. या भूमिकेला न्याय देण्यासाठी राणाला दररोज ४ हजार कॅलरीज घेणं गरजेचं होतं. त्यामुळे तो दिवसाला ४० अंडी खात होता. ८ तास वर्कआऊट करत होता. इतकंच नाही तर त्याने जेवणाच्या वेळादेखील बदली होती

Exit mobile version