Home क्राइम ड्रग्ज पेडलर्सचा NCB च्या पथकावर हल्ला…!

ड्रग्ज पेडलर्सचा NCB च्या पथकावर हल्ला…!

602
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर काल संध्याकाळी मुंबईतील गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांच्यासह एक अधिकारी जखमी झाले आहेत.दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सतत ड्रग्ज पेडलर्स विरोधात कारवाई करत आहेत. दरम्यान, मुंबईत एका छापेमारी दरम्यान एनसीबीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढिल तपास सुरु आहे.

एनसीबीचे पथक कॅरी मेंडिस नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यासाठी गोरेगाव येथे गेले असता.यावेळी एनसीबीच्या पथकासोबत ड्रग्ज पेडलर्सही होते.तेव्हा एनसीबीच्या पथकावर हल्ला करण्यात आला. ५०-६० लोकांच्या जमावाने एनसीबीच्या पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी एनसीबीच्या पथकाला स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचे असलेले ड्रग्ज कनेक्शन हे त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणाऱ्या पथकाने उघड केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here