Marathwada Sathi

कांदा निर्यातीला चालना


मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला चालना मिळाली आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल उपबाजार आवारातील एका व्यापाऱ्याने २५ टन कांदा श्रीलंका देशातील कोलंबो येथे निर्यात करण्यासाठी रवाना केला आहे.कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले होते. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात सहाशे ते सातशे रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा आहे.
येवला तालुक्यातील अंदरसूल उपबाजार समितीतील निर्यातदार कांदा व्यापारी अतुल गाडे अँड मर्चंट कंपनीच्यावतीने श्रीलंका देशातील कोलंबो येथे निर्यातीसाठी कांद्याची योग्य प्रतवारी करून २५ टन कांदा कंटेनरमध्ये केला आहे. तामिळनाडू येथील तुटीकुरान बंदरावरून निर्याती होणार असल्याने अंदरसुल येथून रवाना झाला आहे यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून विदेशी चलन ही केंद्र सरकारला मिळणार आहे.

Exit mobile version