Marathwada Sathi

चिमुकलीच्या नाकातुन डॉ संतोष मुंडेंनी काढल्या तब्बल 34 आळ्या

परळी वैजनाथ : एका लहान मुलीच्या नाकातून एक-दोन नाही तर तब्बल 34 आळ्या काढण्याची शस्त्रक्रिया परळीत करण्यात आली आहे. येथील डॉ संतोष मुंडे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून या चिमुकलीवर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. मुंडे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील एका 9 वर्षीय मुलीच्या नाकातुन 34 वर जिवंत आळ्या निघाल्या आहेत. सतत होणाऱ्या सर्दीकडे दुर्लक्ष केल्यास (Maggots) हा आजार होऊ शकतो. धुळीचे इन्फेक्शन मुळे जेष्ठ नागरिकांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळुन येतो. आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉ संतोष मुंडे यांनी यावेळी केले आहे.

Exit mobile version