बीड
वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष व जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना कोविड योध्दा पुरस्कार देण्यात आला. रविवारी दि.27 डिसेंबर रोजी राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देवून डॉ. वनवेंना सन्मानित करण्यात आले.
डॉ. अभय वनवे हे मागील 20 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोनाच्या मागील आठ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टरांच्या माध्यामातून बीड जिल्ह्यासह राज्यात कोविडचे उत्कृष्ट कार्य केले आहे. शिवाय डॉ. वनवे हे मागील दोन वर्षांपासून जिल्हा बाल कल्याण समितीची अध्यक्ष असून त्यामाध्यामातून ते बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. या कार्याची दखल घेवून राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते त्यांना कोविडा योध्दा पुरस्कार देवून सन्मानित केले. डॉ अभय वनवे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील डॉक्टरांचे योग्य संघटन कौशल्य व समनव्यातुन हजारो डॉक्टरांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी काम केले.दरम्यान, सदरील सन्मान प्रतिनिधी स्वरूपात मला दिला आहे. हा पुरस्कर जिल्ह्यासह राज्यातील डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, आशा कामगार यांच्यासह कोविडचे कार्य करणार्या प्रत्येक घटकांना समर्पित करत असल्याचे डॉ. अभय वनवे म्हणाले.
Home बीड डॉ. अभय वनवेंचा राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते सन्मान वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल...