Marathwada Sathi

डॉ.धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेसमध्ये प्रवेश…!

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील उद्या(२८ जाने.)काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसचा हात धरणार आहेत.मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असून या बातमीला स्वत: डॉ धवलसिंह यांनी देखील दुजोरा दिला आहे

दरम्यान,धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.धवलसिंह यांच्याकडे सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून बघितले जाते.फक्त एव्हढेच नाही तर मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.धवलसिंह सुरुवातीला काळ ते शिवसेनेत होते. परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता.अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version