Home बीड डॉ. रणखांब यांच्या संकल्पनेतून नववर्षा निमित्त पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराची स्वच्छता

डॉ. रणखांब यांच्या संकल्पनेतून नववर्षा निमित्त पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराची स्वच्छता

409
0

पात्रुड
माजलगाव तालुक्यातील पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रणखांब यांच्या संकल्पनेतून नववर्षा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आरोग्य केंद्र मधील आशा वर्कर यांची स्पर्धा लावण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सर्व आशा यांनी आरोग्य केंद्र परिसराची साफसफाई केली या स्पर्धेमध्ये डॉक्टर रणखांब यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक येणाऱ्या अशांना बक्षीस देण्यात येणार आहे. व याच प्रमाणे दर महिन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने आरोग्य केंद्र परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये डॉ. रणखांब, आरोग्य सेवक ठोंबरे, पवार सिस्टर, वाघमोडे सिस्टर, सुपरवायझर गणेश, मस्के मॅडम, आरोग्य सेवक वाघमारे यांच्या सह आरोग्य कर्मचारी यांनी या श्रमदानात हिरिरीने सहभाग नोंदवला होता. यावेळी डॉ. रणखांब यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की असे आरोग्य परिसर स्वच्छता अभियान श्रमदान हे दर महिन्यांमध्ये राबवले जाणार आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता तर होईलच परंतु इथे येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देखील यामुळे या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांना देखील रमान वाटेल. व यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here