Marathwada Sathi

अजिंठा-वेरूळ लेणीचे दरवाजे उघडले…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याची लेणी उद्यापासून (दि.१०) उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन व्यवसायिकांनी औरंगाबाद शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे खुली करावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत शासनाने पर्यटन स्थळे खुली करण्याला परवानगी दिली आहे. पण कोरोनामुळे काही अटी आणि शर्थी लावल्या आहेत.
पर्यटन स्थळे बंद असल्याने या व्यवसायातील व्यक्तींच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. या व्यवसायावर ११ वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे ही पर्यटन स्थळे खुली करावी, अशी मागणी करीत या व्यवसायिकांनी औरंगाबादला आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदनही राज्याच्या पर्यटनमंत्र्यांकडे सादर केले होते.

लेणीसाठी नियम

० गुरूवारी (दि.१०)उघडणार वेरूळ-अजिंठ्याची लेणी
० दिवसभरात २ हजार पर्यटकांना मिळणार प्रवेश
० सकाळच्या सत्रात १ हजार आणि दुपारच्या सत्रात पर्यटकांना मिळेल प्रवेश
० ऑनलाईन बुकींग करूनच जाता येईल लेणीत

www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर तिकीट होऊ शकतील बुक

Exit mobile version