Home इतर ११ वाजता पार्टी संपवू नका……

११ वाजता पार्टी संपवू नका……

265
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : मुंबई महापालिका म्हणते की आज रात्री ११ वाजता पार्टी संपवू नका. पण नव्या वर्षाचे स्वागत घरीच करा.हॉटेल रात्री ११ नंतर घरपोच सेवा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबईत सुरक्षितरित्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करोनाविषयक सुनिश्चित नियमांचे पालन करा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना नियमांचं पालन करुन सर्व नियमांचं पालन करावं असंही आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे मुंबईत रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका. नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा. आता उपहारगृहांना रात्री ११ नंतर होम डिलिव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत ३१ डिसेंबरला पार्टी करत असाल तर रात्री ११ नंतरही तुम्ही खाद्यपदार्थ मागवू शकता असं आता मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here