Marathwada Sathi

साई संस्थानला भाविकांकडून भरभरुन ‘दान’…!

मराठवाडा साथी न्यूज

शिर्डी : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन झाला.लॉकडाऊन नंतर मिशन बीगिन अगेन अंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आणि नियमांसोबत काही गोष्टी सुरु झाल्या.देशभरातील काही मंदिरे सुरु झाली तरी महाराष्ट्राती धार्मिक स्थळे बंद होती. त्यानंतर धार्मिकस्थळे उघडण्यासाठी राज्यात आंदोलने करण्यात आली.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली.परवानगी मिळाल्यानंतर मंदिरांमध्ये नियमांचे पालन करत दर्शनाला सुरुवात झाली.

शिर्डीचे साई मंदिर १६ नोव्हें.पासून भाविकांसाठी खुले झाले.भाविकांच्या दर्शनावेळी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केल्याचे संस्थानचे सीईओ कान्होराज बगाटे यांनी सांगितले.दरम्यान,मिशन बीगिन अगेन अंतर्गत शिर्डीतील साईबाबा मंदिर खुले झाले.शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मंदिर सुरु झाले त्यानंतरच्या ७१ दिवसात सुमारे १२ लाख २१९२ भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे.या ७१ दिवसांमध्ये शिर्डी संस्थानला चक्क ३२ कोटी ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचे भरभरुन दान प्राप्त झाले आहे.

Exit mobile version