Marathwada Sathi

दिव्यांगाच्या साहित्य वाटपाचा खेळ मांडियेला !

मराठवाडा साथी न्यूज

नांदेड : दिव्यांगाना जीवन जगण्यासाठी दैनंदिन  गरजा भागवताना कृत्रीम अवयवांसह साहित्याचा आधार मिळावा या उद्देशाने मागील वर्षी तत्काली जिल्हा अधिकारी अरूण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभर राबवण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही जिल्हा प्रशासनाला शिबीरातील नोंदीनुसार दिव्यांग लाभार्थींना गरजेनुसार कृत्रीम अवयव, साहित्य वाटपाचा विसर पडल्याचा आरोप बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती समितीचे अध्यक्ष राहूल साळवे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा  दिव्यांग पुनर्वसन केंद्र , जिल्हाप्रशासन, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तत्कालीन जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या पुढाकराने (दि.१०) डिसेंबर  २०१९ ते (दि.२६) डिसेंबर २०१९ दरम्यान शहरासह जिल्हाभरात तालुकास्तरावर दिव्यांगांसाठी शिबीर घेण्यात आले. गरजू दिव्यांगांना कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने, व संसाधने मोफत वाटपासाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या शिबीरासाठी नियोजनांवर लाखो रुपये खर्च करत मोठा गाजावाजा करण्यात आला. शिबीरामध्ये सहभागी दिव्यांगाची तपासणी  करून गरजेनुसार लाभार्थींना अवघ्या दोन महिन्यांत मोर्च 2020 मध्ये साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गरजेनुसार साहित्य मिळण्याच्या अपेक्षेने या शिबीरास जिल्ह्यातील दिव्यांगातून चांगला प्रतिसाद मिळाला.  शिबीरातील निकषानुसार जवळपास पंधरा हजार दिव्यांगाची तपासणी करण्यात आली. त्यातच कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. त्यातच  तत्कालीन जिल्हाधिकारी अरुन डोंगर यांची प्रशासकीय बदली झाली. कोरोना महामारीच्या संकट,  आणि जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची बदली या शिवाय तांत्रीक कारणांमुळे दिव्यांग शिबीरातील लाभार्थींना कृत्रीम अवय, साहित्य वाटपाचा कार्यकाळ वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत अवास्तव समस्यांशी झुंजणाऱ्या असाह्य दिव्यांगाना आधाराची गरज असल्याने संघटनेचे अध्यक्ष राहूल साळवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शिबीरातील नोंदीप्रमाणे लाभार्थींचे सर्व साहित्य प्राप्त झालेले आहेत. लवकरच लाभार्थींना कृत्रीम अवयव, साहित्यांचा लाभ देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही  जिल्ह्यातील हजारो दिव्यांग लाभार्थी अद्याप कृत्रीम अवाय, साहित्यांच्या प्रतिक्षेत असल्याचा आरोप संघटनेचे राहुल साळवे यांनी केला आहे. दरम्यान, एडिप योजने अंतर्गत शिबीरातील नोंदीनुसार जिल्हाभरातील लाभार्थींना येत्या (दि.3) डिसेंबर पर्यंत कृत्रीम अवय, साहित्यांचे वाटप करण्याची मागणी संघटनेचे राहूल साळवे यांनी प्रसिद्धीद्वारे केली आहे.

Exit mobile version