Home Uncategorized 26 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय ऑनलाइन युवा महोत्सवाचे आयोजन

26 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय ऑनलाइन युवा महोत्सवाचे आयोजन

710
0

बीड
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा बीड यांचे मार्फत जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 26 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे.
          
सदर युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतात. सन 2015-16, 2016-17, 2017-18 या तीन वर्षात राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या युवक व युवतीला चालु वर्षी सहभागी होता येणार नाही. तसेच सहभागी होणाऱ्या युवक युवतीचे वय दि. 12 जानेवारी 2020 रोजी 29 वर्षापेक्षा अधिक नसावे. तथापी कलाकाराने वयाची 15 वर्षे पुर्ण केलेली असने बंधनकारक राहील. युवा महोत्सवात  लोकनृत्य (20 कलाकार, 15 मी.) लोकगीत (10 कलाकार, 07 मी. ) एकांकिका (इंग्रजी किंवा हिंदी 12 कलाकार, 45 मी.) शास्त्रीय गायक ( हिंदुसतानी , 1 कलाकार, 15 मी. ) शास्त्रीय वादन सितार वादन ( 1 कलाकार, 15 मी. ), बासरी ( 1 कलाकार, 15 मिनीटे ), तबला ( 1 कलाकार, 10 मी. ), वीणा ( 1 कलाकार 15 मी. ), मृदंग (1 कलाकार, 10 मी.) हार्मोनियम (लाईट, 1 कलाकार, 10 मी.) गिटार (1 कलाकार, 10 मी.), शास्त्रीय नृत्य-मणिपुरी नृत्य ( 1 कलाकार, 15 मि.), ओडीसी नृत्य (1 कलाकार, 15 मी.) भरतनाटयम ( 1 कलाकार, 15 मी. ), कथ्थक (1 कलाकार, 15 मी.), कुचिपुडी (1 कलाकार, 15 मी.), वक्तृत्व ( आयत्या वेळेचा विषय, हिंदी किंवा इंग्रजी, 1 कलाकार, 04 मी. ) या बाबी व कलाकार संख्या राहणार आहे.
          
दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन जिल्हास्तर युवा मोहत्सवाचे उद्घाटन होईल व लगेच शास्त्रीय वादन, शास्त्रयनृत्य, शास्त्रीय गायन, वक्तृत्व, लोकगीत, लोकनृत्य, एकांकीका या कला प्रकारच्या स्पर्धा नियोजनाप्रमाणे होतील. ऑनलाईन सादरीकरणा करिता सहभागी होणारा कलाकारांना, संघांना ऑनलाईन गुगल मीटची लिंक देण्यात येणार आहे.
          लोकनृत्य प्रकारामध्ये भारतीय लोकनृत्य सादर करण्यास परवानगी आहे. लोकगीत असावे, लोकनृत्य व लोकगीतासाठी कोणतेही चित्रपट गीत गायन करता येणार नाही किंवा ध्वनीफित वापरता येणार नाही. नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांना पुर्वमुद्रीत ध्वनीफितीवर कार्यक्रम सादर करता येईल. शास्त्रीय गायन प्रकारामध्ये चित्रपट गीतास परवानगी नाही. वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषा हिंदी असावी. वकृत्व स्पर्धेसाठी विषय ऐनवेळी दिला जाईल. सर्व कलाकारांना त्यांना लागणारे साहित्याची त्यांनी स्वत: व्यवस्था करावयाची आहे.                                                                                              
          युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने जन्मतारखेच्या दाखल्यासह ( जन्मप्रमाणपत्र, शाळा / कॉलेजच्या टी.सी. ची प्रत / बोनाफाईट प्रमाणपत्र ) व आधार कार्डाची प्रतीसह प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धकाने सादर करणाऱ्या प्रकारा संबंधीची माहिती तीन प्रतीत द्यावी लागेल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. त्यासंबंधी कोणताही आक्षेप स्विकारला जाणार नाही.

बीड जिल्हयातील युवक, युवती, युवक मंडळे, नाटयमंडळे, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालय यांनी याची नोंद घेऊन कलाकारांना सदर युवक महोत्सवात सहभागी  करावे. सदर महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी, संघानी त्यांचे प्रवेश अर्ज जन्म तारखेच्या दाखल्यासह व अधार कार्ड च्या प्रती सह दिनांक 24 डिसेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल इमारत, बीड येथे सादर करावेत. उशीरा येणाऱ्यांचे प्रवेश अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिकच्या माहिती करीता क्रीडा अधिकारी कार्यालय बीड येथे श्री. अरविंद विद्यागर मो. क्र. 9422243435 व श्रीमती सुप्रिया गाढवे मो.क्र.8308792661 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. जिल्हयातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी युवा महोत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहन अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here