Marathwada Sathi

जिल्हा प्रशासनाचा ‘घोळ’…!

मराठवाडा साथी न्यूज

नांदेड : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांचा घोळ झाला आहे.या घोळामुळे आता नांदेड जिल्ह्यातील कोसमेट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळकी खुर्द गावातील मतदारांना मतदानाच्या हक्कापासून दूर राहावे लागणार आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा बोट दाखविले जात आहे.२ हजार ते अडीच हजार गावसंख्या असलेल्या या गावातील गावकरी गेल्या ५० वर्षांपासून आपल्या मतदानाचा हक्क बजावत होते.

दरम्यान,मतदार याद्यांमध्ये अनोळखी लोकांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याने,वाळकी या गावातील लोकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे या याद्यांमध्ये दुरुस्ती करुन मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी गावकरी करत आहेत.

Exit mobile version