Home आरोग्य सौरव गांगुली यांना ‘डिस्चार्ज’…!

सौरव गांगुली यांना ‘डिस्चार्ज’…!

158
0

मराठवाडा साथी न्यूज

कोलकाता : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मागच्या आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्यांच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती.आता मात्र, सौरव यांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत असून त्यांना कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सौरव यांना बुधवारीच(६ जाने.)रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता,मात्र त्यांनी अजून एक दिवस रुग्णालयात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सौरव यांच्याविषयी सांगत वूडलॅन्ड रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर रुपाली बसू म्हणाल्या की,’गांगुली आता क्लिनिकली फिट आहे.त्यांना चांगली झोप लागत असून ते जेवणही व्यवस्थित करत आहे.त्यांना अजून एक दिवस रुग्णालयात राहायचे होते.त्यामुळे मुक्काम अजून एक दिवस वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’

दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तसेच रुग्णालयाकडून आवाहन करण्यात आले आहे की,’आता सौरवाची तब्येत चांगली आहे, त्याला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालय किंवा त्यांच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी करू नये.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here