Home क्रीडा ‘दिलदार’ सचिन…!

‘दिलदार’ सचिन…!

626
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणारा सर्वांचा आवडता सचिन तेंडुलकर हा अगोदरपासूनच मुंबईमध्ये गरजू मुलांसाठी एसआरसीसी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार करत आहे.‘एकम फाऊंडेशन’ च्या मदतीने सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू मुलांना सचिन आर्थिक मदत करतो. अनेकवेळा गरीब मुलांच्या पालकांना त्यांच्या गंभीर उपचारांसाठीचा खर्च करणं परवडत नाही, अशा गरजू मुलांचा उपचारासाठीचा खर्च सचिन उचलतो.

दरम्यान,सचिन तेंडुलकर याने आता त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने ६ राज्यांमधल्या १०० गरीब विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च उचलला आहे.महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या विद्यार्थ्यांची मदत सचिन करणार आहे. नोव्हेंबर २०१९ सालापासून सचिन त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here