Home इतर खायचे आणि दाखवायचे ‘दात’ वेगळे;अमित शहांनी पश्चिम बंगाल मध्ये केला देखावा…!

खायचे आणि दाखवायचे ‘दात’ वेगळे;अमित शहांनी पश्चिम बंगाल मध्ये केला देखावा…!

732
0

मराठवाडा साथी न्यूज

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच(५ नोव्हेंबर)पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केली.चक्क केंद्रीय गृहमंत्री मंत्री ‘आदिवासी’ कुटुंबाच्या घरी जेवताय हि सामान्य जनतेसाठी मोठी गोष्ट होती,चतुर्दिही गावामध्ये राहणाऱ्या विभीषण हंसदा यांच्या घरी शाह यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. जे फोटो समोर आले त्यामध्ये अमित शाह यांनी वरण, भात, पोळी आणि भाज्यांचा आस्वाद घेतल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे त्यांचे हे फोटोज सोशल नेटवर्किंग साईड्स वर व्हायरल झाले होते. यावेळी अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही होते.

मात्र,राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा सर्व प्रकार म्हणजे केवळ एक नाटक असल्याचा आरोप केलाआहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी बांकुडा जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह यांनी पाहुणचार घेणं हे केवळ नाटक होते.अमित शाह यांच्यासाठी बनवलेले जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अमित शाह यांनी केलेले जेवण हे ब्राह्मण आचाऱ्याकडून बनवून घेण्यात आल्याचाही दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

बांकुडा येथील खटरा येथे एका सरकारी कार्यक्रमामध्ये ममता यांनी भाजपाने आयोजित केलेला हा भोजानाचा कार्यक्रम हा दिखाव्यासाठी होता असं म्हटलं आहे. “समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये दलित कुटुंबातील सदस्य हे कोबी आणि कोथिंबीर कापताना दिसत होते. मात्र ते फोटोंमधील ताटात कुठेच दिसून आलं नाही. अमित शाह यांनी बासमती भात, पोस्टा बोरा खाल्लं,” असा दावाही यावेळी ममता यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here