Home मनोरंजन “द व्हाईट टायगर “चा ट्रेलर घालतोय धुमाकूळ

“द व्हाईट टायगर “चा ट्रेलर घालतोय धुमाकूळ

8
0


मराठवाडा साथी

डिसेंबर मध्ये रिलीज होणार “राजकुमार- प्रियांकाचा” हा चित्रपट
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अभिनेता राजकुमार राव चित्रित ” द व्हाईट टायगर ” या सिनेमात ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. आणि याला काही दिवसांतच सोशल मीडियावर लाईक केले जात आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून प्रियांका- राजकुमार दिल्लीतस्थित एका श्रीमंत जोडप्याची भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. तर अभिनेता आदर्श गौरव त्यांच्या कारचालकाची म्हणजेच “बलराम” ही भूमिका साकारकत आहे. श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारा बलराम त्याला शक्य होईल तितके प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मात्र, एका वळणावर श्रीमंत होण्याच्या ध्येयाने पछाडलेला बलराम चुकीच्या मार्गाला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा पालटते. या कथेत नेमकं काय होतं हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.
‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमिन बहरानी करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here