Marathwada Sathi

धारुर एसटी महामंडळाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

किल्लेधारुर : धारुर बस स्थानकातील पुरुष आणि महिला दोन्ही प्रसादनगृह पुर्णपणे अस्वच्छता असल्याचे चित्र दिसून आले. या मुळे प्रवाशांची ऊचंबना होत आहे. राज्यातील आणि जिल्हातील धारुर शहरात प्रवास करण्याची संख्या खुप आहे शहरातील बाजारपेठ तसेच सिताफळ येथील प्रसिद्ध आहे सोने,चांदी साठी धारूर बाजार पेठ प्रसिद्ध आहे यामुळे शहरात येणार्या प्रवाशांचा कल जास्त प्रमाणात आहे. तसेच शहराला वारसा मिळाला ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटन येतात पण धारूरच्या बसस्थानकात बाहेरील पर्यटकांना तेथील सुविधा पाहून शहर कसे असेल हा प्रश्न निर्माण होतो. शहरात आलेल्या प्रवाशांच्या आरोग्याची आणि परिसर स्वच्छतेची कोणतेही काळजी एसटी महामंडळ घेतांना दिसून येत नाही.असे चित्र दिसून येत आहे.या प्रकरणी वरिष्टाने जातीने लक्ष घालत परिसर स्वच्छ ठेवावा आणि प्रवाशांनच्या अरोग्यकडे लक्ष दयाव असे आव्हान प्रवाशी नागरिकांन कडुन होत आहे. धारूर बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहता व तेथील जागेचा वाद हा प्रश्न कधी सुटेल व नवीन बसस्थानकाची वास्तु कधी पाहायला मिळेल हा प्रश्न तारांकित आहे. बसस्थानकचा अर्ध्याच्या वर परिसर बाभूळ बन झालेला आहे मोठमोठ्या काटेरी बाबळी चे बाबळ बन झालेले आहे.
किल्ले धारूर शहरांमध्ये खास करून किल्ला आणि श्री.आंबाचोंडी मातेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो पण बसस्थानकामध्ये असुविधा. पिण्यासाठी पाणी नाही, पुरुष व महिलांसाठी स्वच्छालय सफ,स्वच्छ नाही.अशा अनेक समस्या बसस्थानकामध्ये आहेत त्यामुळे आमची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते
प्राध्यापक महेंद्र ठाकूरदास

Exit mobile version