Home मनोरंजन धनुष आणि सई पल्लवीच्या ‘राउडी बेबी’ गाण्याने यूट्यूबवर मिळवले अब्जाहून व्ह्यूज

धनुष आणि सई पल्लवीच्या ‘राउडी बेबी’ गाण्याने यूट्यूबवर मिळवले अब्जाहून व्ह्यूज

488
0

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सई पल्लवी यांच्या ‘राउडी बेबी’ गाण्याने यूट्यूबवर एक अब्ज व्यूव्ह्जची संख्या ओलांडली आहेत. धनुष आणि सई पल्लवी यांचे ‘राउडी बेबी’ हे गाणे ‘मारी 2’ या चित्रपटातील आहे. या गाण्याचे संगीत युवाशंकर राजा यांनी दिले आहे, तर या गीताचे बोल धनुष यांनी लिहिले आहेत. या गाण्याला धनुष व्यतिरिक्त धी हिने आपला आवाजही दिला आहे.

राउडी बेबीच्या यशाबद्दल प्रेक्षकांचे धनुषने ट्विट करून आभार मानले आहेत. ”हा एक सुखद संयोग आहे. राऊडी बेबीने एक अब्ज व्यूव्ह्ज मिळवले आहेत. तेही कोलावरी डीच्या नवव्या वर्धापनादिवशी. आमच्यासाठी ही सन्मानजनक गोष्ट आहे. हे पहिले दाक्षिणात्य गाणे आहे ज्याला अब्जावधी व्ह्यूव्ह्ज मिळाले आहेत. आमची टीम आपले मनापासून आभार मानतो.,” असे धनुषने लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here