Home औरंगाबाद २२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन

२२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन

117
0

औरंगाबाद ते जालना करणार मानवी साखळी आंदोलन

औरंगाबाद : घटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली Dhangad (इंग्रजी) हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकाराच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झालेले आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी ते मान्य केले आहे. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या ६५ वर्षांपासून धनगर समाज घटनेने अधिकार देऊनही आपल्या अधिकारापासून वंचित आहे. हा अधिकार मिळावा म्हणून राज्यातील धनगर समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत आहे. महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती सरकारच्या काळात टाटा इन्स्टिटूटची स्थापना करून पाच वर्ष धनगर समाजाची दिशाभूल करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समजाला अनु. जमातीचे आरक्षण देणार अशा फक्त घोषणा केल्या. मागील सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख व आताचे विधानसभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा धनगर समजला अनु. जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली तरी अजून धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणून २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे सहकारमंत्री संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौक येथील निवास्थानापासून ते रावसाहेब दानवे (केंद्रीय राज्य मंत्री ) भोकरदन येथील निवास्थानी ६० कि.मी. मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याच्या इतर जिल्यातील धनगर समाज अर्ध जलसमाधी आंदोलन करणार आहे. या राज्यव्यपी आंदोलनाचे नेतृत्व लहुजी शेवाळे, विठ्लराव खडके, डॉ. सुभाषराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे केले जाणार आहे. शिवाजी काटकर, काशिनाथ आरगडे, नाना साबळे, सोन्याबापू गावडे, दिगंबर खंडागळे, विठ्ठल कोरडे, प्रकाश चांगुलपाई, विष्णु खरपे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


आरक्षणासाठी २२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे मानवी साखळी आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here