Marathwada Sathi

धनाने केले यूझीला ” क्लीन बोल्ड “

मराठवाडा साथी

गुरुग्राम : भारतीय क्रिकेटर युझवेन्द्र चहल आणि धनश्री वर्मा मंगळवारी लग्नबेडीत अडकले. भारतीय लेग स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युझीला अखेर धनश्रीने क्लीन बोल्ड केले. धनश्री हि एक डॉक्टर , कोरियोग्राफर आणि युट्युबर आहे. युझवेन्द्र चहलने लग्नाचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. गुरुग्राम येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
कोरोनाच्या नियमांमुळे मोजक्या आप्तमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. युजवेंद्र चहलने लग्नाचा एक कँडिड फोटो #DhanaSaidYuz असा हॅशटॅग वापरत शेअर केला आहे.त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शुभेच्छांचा वर्षाव :
युझिवर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. शिखर धवन , वीरेंद्र सेहवाग यांनी त्याचे फोटो पोस्ट करून नव आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. त्याच्या फॅन्सकडूनही त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Exit mobile version