Marathwada Sathi

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घ्यावा…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कर्नाटकचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळले पाहिजे.त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे,असे संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले आहेत.यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरु नये. दरम्यान,सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे असे म्हंटले.

पुढे संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशूनम्हणाले की, “कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावे आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथे ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान इथे घेतले तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातच आले पाहिजे.”

दरम्यान,”अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशाप्रकारचे राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचे पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, एवढचे मी सांगतो. या विषयावर ज्या पद्धतीने पाऊल टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरुवात झालेली आहे. कुणी तिकडे काही बरळले तरी इकडे आम्हाला फरक पडत नाही.” असा इशारा देखील संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला केला.

Exit mobile version