Home औरंगाबाद आता ड्रोनद्वारे होणार डिलिव्हरी…!

आता ड्रोनद्वारे होणार डिलिव्हरी…!

531
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : येणाऱ्या काळात खाण्याच्या पदार्थापासून औषधींपर्यंत ची डिलिव्हरी ड्रोनच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे.याकरीता नागरी उड्डाण मंत्रालयाने अजून कंपन्यांना दीर्घ कालीन ड्रोन उड्डाणांचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे.Skylark बरोबर स्विगी हा प्रयोग करत आहे. या सुविधेची सुरुवात झाल्यास वेळेची बचत होईल आणि लोकांनाही सुविधा मिळेल.मारुती ड्रोनटेकला BVLOS ची परवानगी मिळाली आहे, ते वैद्यकीय पुरवठा करण्याबाबत तेलंगणा सरकारबरोबर काम करत आहेत. आतापर्यंत एकूण २० कंपन्यांना अशी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान,मे मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन ने ड्रोनच्या माध्यमातून ई-कॉमर्स पार्सल डिलिव्हरीला स्पाइसजेट कंपनीची मालवाहू युनिट स्पाइसएक्सप्रेसला परवानगी दिली होती. डीजीसीएने दिलेल्या या मंजुरीनंतर आता स्पाइसजेट ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास सक्षम असेल. दुर्गम भागात या गोष्टी पोहोचवणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here