Marathwada Sathi

दिल्ली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी रात्री उशीरा आढावा बैठक घेतली. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर या सर्व नेत्यांना लुक आउट नोटीस पाठवण्यात आली असून त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबिरसिंह राजेवाल, बुटासिंग बुर्जगिल, योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि जिगिंदर सिंह उग्रहा यांच्यासह ३७ शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. प्रजासत्ताकदिनी दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्यासंदर्भात झालेल्या कराराच्या नियमाचा भंग झाल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version