Home मुंबई कोरोनास्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भात घेतले जातील निर्णय

कोरोनास्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भात घेतले जातील निर्णय

255
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे कसे असतील? यावर मुंबई लोकल सुरु करण्याचा कोणताही निर्णय अवलंबून असेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.या आठवड्यातील कोरोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांची स्थिती पाहूनच मुंबई लोकलसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी अजून किती दिवस वाट बघावी लागेल हे अजून निश्चित नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here