Marathwada Sathi

सर्वांसाठी ‘लोकल’ सुरु करण्याबाबत निर्णय…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : लोकांसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लोकल सेवा बंद केली गेली होती. पण धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे लोकलसेवा मर्यादित लोकांसाठी सुरु आहे. सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना उत्तर हे मिळाल नाही .
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, ‘नव वर्षात रुग्ण संख्या किती वाढतेय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबईतील लोकल सेवा सुरू करायच्या की नाही, शाळा, कॉलेज सुरू करायच्या की नाही हे सगळे निर्णय संख्येवर अवलंबून आहेत. यूकेतील नवीन स्ट्रेनवर आपण लक्ष ठेवून आहोत. याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील.’असं टोपे यांनी सांगितलं आहे

Exit mobile version