Marathwada Sathi

उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय,गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित

लखनऊ : उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका फौजदारी खटल्यात दिलेल्या आदेशात गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची गरज व्यक्त केली आहे. धार्मिक म्हणींचा हवाला देत न्यायालयाने म्हटले आहे की, जे गायीला मारतात ते नरकात जातात आणि त्यांच्या शरीरावर केस असतील तेवढी वर्षे नरकात राहावे लागते. या निरीक्षणांसह गोहत्या कायद्यांतर्गत दाखल झालेला खटला रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. बाराबंकीचे रहिवासी मोहम्मद अब्दुल खालिक यांची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा आदेश दिला.

पुढे म्हणाले की, देशात गोहत्या बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गोहत्या बंद करण्यासाठी प्रभावी निर्णय घ्यावा. न्यायालयाने सांगितले की, हिंदू धर्मात गायीला सर्वात पवित्र प्राणी मानले जाते. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूच्या रूपातही तिची पूजा केली जाते.

Exit mobile version