Marathwada Sathi

खचलेल्या पुलावरुन जीवघेनी वाहतूक

मराठवाडा साथी न्यूज

बीड: अतिवृष्ठीमुळे बीड- साक्षळपिंप्री मार्गावरील डोमरी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दूरुस्तीचा विसर पडल्याने नागरीकांना मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा पुल खचल्यामुळे जीवघेणी कसरत करणाऱ्या वाहनधारकांनी पुल दूरूस्तीची मागणी केली आहे.

परतिच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते उखडले तर कित्तेक ठिकाणचे पुल खचले आहेत. उखडलेल्या रस्त्यांसह खचलेल्या पुलावरुन वाहतूक सुरू असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागस मात्र, दूरुस्तीचा विसर पडला आहे.

साक्षळपिंप्री –बीड रस्त्यावरुन तिर्थक्षेत्र नारायणगड परिसरातील गावखेड्यांची कायम वाहतूकीची वर्दळ असते. साक्षळपिंप्री परिसरातील गावखेड्यांतील नागरीकांसह रुग्णांना बीड शहकराडे घेउन जाण्यासाठी वाहनधारक धजावत नसल्याने वेळेत उपचारास हक्काच्या प्रवासाची बाधा निर्माण होत आहे.

दरम्यान, फुलसांगवी (ता.शिरुर का.), उक्कडपिंप्री, पौंडूळ, धारंवटा, हाजीपूर, केतुर , बेलूरा आदी गावांना शहरास जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याचा पुल खचल्याने  परिसरातील वाहतूक खोळंबली आहे. अतिवृष्ठीला महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागस अद्याप पुल दूरुस्तीला उसंत मिळत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. खसलेल्या पुलावरुन जीव मुठीत घेउन प्रवास करणाऱ्या नगारीकांसह वाहन चालकांनी तात्काळ पुल दूरुस्तीची मागणी केली आहे.  

Exit mobile version