Marathwada Sathi

है हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की….. ?

“तांडव ‘ वेबसिरीज वादप्रकरणी कंगनाचे ट्विट

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहत असते. आता तिने नुकतेच “तांडव ” वेबसिरीज वादप्रकरणाबाबत ट्विट केले आहे. ” तांडव “या वेब सीरिजमधील कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत निर्माते अली अब्बास जफर यांना है हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की? असा सवाल केला आहे.

‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली आहे.आता याच प्रकरणावर कंगनाने ट्विट केले आहे. “माफी मागण्यासाठी वाचणार कुठे? हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढतात, लिब्ररल मीडिया वर्च्युअल लॉन्चिंग करते, तुम्हाला केवळ मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला जस्टिफायही केले जाते. अली अब्बास जफर अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

Exit mobile version