Marathwada Sathi

दानवेंचा डीएनए ‘हिंदुस्थानी’ की ‘पाकिस्तानी’…?

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : देशभर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असून आंदोलनाला सर्वत्र पाठींबा मिळत आहे.मात्र,हे सुरु असतांनाच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अनोखे आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे.ज्यामुळे दानवेंवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.’शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून पाकिस्तान आणि चीन चा यामध्ये हात आहे’.हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही असे रावसाहेब रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान,दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलतांना म्हणाले की ,दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल. पुढे बच्चू कडू म्हणाले की ,आम्ही दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. आता दानवे यांच्या घरात घुसून त्यांना मारावे लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version