मराठवाडा साथी न्यूज
पैठण । विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये दोन कामगार भाजले आहे . त्यांना औरंगाबादच्या खाजगी रूग्णालायात दाखल केले आहे. त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपासून हे प्रकरण कारखान्यातील अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी दाबवून ठेवले होते. त्यानंतर या संदर्भातील माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर घटना कळाली. या संदर्भात कार्यकारी संचालक बावडकर यांच्या संपर्क साधला असता स्फोट झाला नसल्याचे त्यांनी गोलमोल उत्तर दिले. संचालक मंडळ व चेअरमन यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला आहे. वेळीच लक्ष दिले असता असा प्रकार घडला नसता. जखमी कामगारांची प्रकुती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
याबाबत कार्यकारी संचालक याना विचारले असता वेल्डिंग करताना जाळ झाल्याने कामगार भाजले असल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु गॅस वेल्डिंगने कसे काय कामगार भाजू शकतो का यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. कारखान्यात सिलेंडर फुटल्याने कामगार जखमी झाले आहे.
बॉयलर पेटण्याच्या अगोदर विविध प्रकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु संचालक मंडळ यांनी कोणत्याही प्रकारची प्रकारची परवानगी घेतली नाही. कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
- विनोद पाटील तांबे, तालुकाध्यक्ष काँग्रेस