Marathwada Sathi

शोभेची झाडे खरेदीसाठी गर्दी

प्रतिक्षा पगारे/मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :
दिवाळी निमित्त बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशनच्या वस्तु बघायला मिळत आहेत. त्यातच शोभेसाठी वापरता येतील आणि कोणाला गिफ्ट म्हणूनही देता येतील अशी फुले मार्केटमध्ये आली आहेत आणि ती ग्राहकांना पसंत देखील पडत आहेत. अशातच मार्केटमध्ये नवीन आलेल्या शोभेचे झाड आणि फुलांबद्दल जाणून घेण्याकरिता औरंगपुरा येथील ‘त्रिमूर्ती होम डेकोर’च्या पवन बोढके यांच्याशी ‘दै.मराठवाडा साथी’ च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

बाँजाय :
बाँजाय हे शोभेच झाड असून यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत .त्यामध्ये मोठे-छोटे, वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे बाँजाय उपलब्ध आहेत. यांच्या एका जोडीची किंमत २५०रु.आहे.

बॉल स्टिक :
या स्टिक्स दिसायला अत्यंत आकर्षक असून घराची शोभा वाढविण्याकरिता आपण यांचा वापर करू शकतो. एका स्टिकची किंमत २५० रु. आहे.

रोझ स्टिक :
समारंभ कोणताही असो तिथे गिफ्ट देण्यासाथी रोझ स्टिक्स सर्वात चांगले ऑप्शन आहे. कारण, या स्टिक्स दिसायला ही सुंदर असतात आणि शोच्या असल्यामुळे त्यावरील फूल खराबही होत नाहीत.त्यामुळे कोणाला गिफ्ट देण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो. आपल्या या स्टिक्स १०० ते २५० रु.पर्यंत सहज मिळतात.

पवन बोढके (त्रिमूर्ती होम डेकोर, औरंगपुरा) : आमची अगोदर नाशिकमध्ये शॉप होती.औरंगाबादमध्ये शॉप सुरु करुन आता वर्ष होईल.सुरुवातीला धंदा खुप चांगला सुरु होता. मात्र, कोरोना काळात ग्राहकांची संख्या कमी झाली होती.सध्या दिवाळीमुळे नवीन प्रकारची शोची झाडे व फुले आली आहेत आणि ग्राहकांनाही ते खरेदी करण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे, आता अगोदरप्रमाणे ग्राहक खरेदी करतील, असे वाटत आहे.

Exit mobile version