Home परळी वैजनाथ ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी परळी तहसिल कार्यालयात गर्दी

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी परळी तहसिल कार्यालयात गर्दी

158
0

परळी : राज्यातील ३४ जिल्ह्यांत असणाऱ्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. दुपारी ३ वाजेवरून अर्ज भरण्यासाठी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच परळी तहसिलच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईनमध्ये अर्ज भरण्यास अडथळे येत असल्याने ऑफलाईन अर्जही स्विकारण्यात येत आहेत.

परळी वैजनाथ तहसिलच्या प्रांगणात सात ग्रामपंचायतच्या 57 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची चालू असलेली लगबग..

परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ज्याची मतमोजणी तद्‌नंतर १८ जानेवारी रोजी होणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी परळी तहसिल कार्यालयात ईच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत ११ सदस्य, गडदेवाडी ७, सरफराजपूर ७, रेवली ९, भोपला ७, वंजारवाडी ७, लाडझरी ९ अशा एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार नसल्यामुळे सदस्यांमधूनच निवडूण येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे घोषीत केलेले आरक्षण रद्द केले असून, निवडणूकीच्या नंतर आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. एकूण उमेदवार किती रिंगणात उतरतील याबाबत सविस्तर माहीती अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच मिळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here