Home औरंगाबाद अट्टल गुन्हेगार गावठी पिस्टलसह गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची पाचोडला कारवाई

अट्टल गुन्हेगार गावठी पिस्टलसह गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची पाचोडला कारवाई

0

औरंगाबाद : अट्टल गुन्हेगाराला ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गावठी पिस्टल आणि काडतुसासह शनिवारी पैठण तालुक्यातील पाचोड येथून अटक केले. सचदेव मुराब पवार, (२७, रा. रामगव्हाण, ता.अंबड, जि.जालना) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर दरोडा यासह अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून ६० हजरांची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी पाचोड परिसरामध्ये गुन्हयाच्या तपासासाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, अट्टल गुन्हेगार सचदेव पवार हा गावठी पिस्टलसह शिवाजीनगर पाचोड येथे रोडवर उभा आहे. त्यावरुन फुंदे यांच्यासह पथकाने सापळा रचुन सचदेवला गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस, विविध बँकांचे तीन एटीएम कार्ड आणि मोबाईल असा एकूण ६० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अट्टल गुन्हेगार सचदेव याच्या विरुद्ध दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक फुंदे यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभाग पैठण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दिल्ली, जमादार श्रीमंत भालेराव, प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, राहुल पगारे, नरेंद्र खंदारे, रामेश्वर धापसे, उमेश बकले यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here