Home आरोग्य कोविड-19 लसीचा प्राधान्यक्रम ठरला : टोपे

कोविड-19 लसीचा प्राधान्यक्रम ठरला : टोपे

315
0

मराठवाडा साथी न्यूज

० आरोग्य सेवकांचा पहिला नंबर
५० वर्षावरील कोमोर्बिड लोकांना
५० वर्षावरील लोकांना देणार
११ कोटीपैकी ३ कोटींना पहिल्या टप्यात
० लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथे बसविणार
० मतदानाच्या बुथप्रमाणे लसीकरण करणार
१६ हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

मुंबई : कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरणा पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. ११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपेंनी केले रक्तदान

अनेक कंपन्यांच्या कोरोना लस अंतिम टप्प्यात असून लवकरचं देशात लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात कशा प्रकारे लसीकरण होणार? प्राधान्यक्रम काय असणार? या विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राज्यात रक्तसाठा कमी असल्याने लोकांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्यासाठी राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळेंनी आज रक्तदान केले. त्यानंतर ते बोलत होते.

पवारांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० तारखेपर्यंत स्वाभिमान सप्ताह आयोजित केला आहे. या काळात रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. आज रक्तदान करून आम्ही इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करतो. राज्यात ४ ते ५ दिवसांचेच रक्त शिल्लक असल्याची माहिती टोपे यांनी दिली. महाराष्ट्रात सरकारी रूग्णालयात मोफत रक्त देणार, एकही पैसा घेणार नाही. याची अंमलबजावणी १२ डिसेंबरपासून होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

कोरोना लस प्राधान्यक्रमाने दिली जाणार : टोपे

कोरोनाची लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथं बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.

लस घेतल्यावरही मास्क, सोशल डिस्टन्सिंग

ब्रिटन आणि रशियासह काही देशांमध्ये कोरोनाची लस आता लोकांना दिली जात आहे. अशी अपेक्षा आहे की येत्या काही आठवड्यात भारतातही कोरोना लसीचे लसीकरण सुरू होईल. दरम्यान, कोविड-19 लस घेतल्यानंतर मास्क घालण्याची गरज भासणार का? लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्स आवश्यक राहील का? असे प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मात्र, लसीकरणानंतरही लोकांना पुढील काही दिवस मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला जाईल. अमेरिकेच्या फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक या कंपनींनी विकसित केलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. फायझरच्या पहिल्या लसीकरणानंतर, पुढील लस तीन आठवड्यांनंतर दिली जाणार आहे. तर, मॉडर्ना लसीच्या पहिल्या डोसच्या चार आठवड्यांनंतर, लसीचा दुसरा डोस दिला जाईल. लसीचा सहसा त्वरित परिणाम होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here