Marathwada Sathi

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सहा आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश…!

मराठवाडा साथी न्यूज

दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी उच्च न्यायालय संदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयांना कॉमेडीयन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना नोटीस पाठवली असून, येत्या सहा आठवड्यात बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोघांना स्वत: कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं म्हणत कोर्टानं याबाबत दोघांनाही सूट दिली.

रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर, स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी न्यायालयाचा तीव्र शब्दात निषेध केला. कुणाल कामरा यांनी उच्च न्यायाल्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात मोठा वाद सुरु झाला.

के. के. वेणुगोपाल यांनी तातडीने कुणाल कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय की, न्यायालयाचा अवमान म्हणजे नक्की काय आणि न्यायालयाचा अवमान कोणत्या परिस्थितीत होतो? काही दिवसांपूर्वी एका वकिलांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करण्याची मागणी अॅटर्नी जनरल यांना सांगितलं होत .

Exit mobile version