Marathwada Sathi

सेंट्रल विस्टा प्रकल्पाला कोर्टाची मंजुरी…!

मराठवाडा साथी न्यूज

१३,४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पात होणार नवीन संसद भवनची निर्मिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आता हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.सेंट्रल विस्टा प्रकल्पाला म्हणजेच संसद भवनला सर्वोक सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.हे खंडपीठ सरकारला या प्रकल्पासाठी मंजुरी देत आहे असे न्यायमूर्ती एएम खानविलकर,न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी,न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने २-१ अशा बहुमताने निर्णय सुनावताना म्हंटले आहे.फक्त एव्हढेच नाही सर्व या प्रकल्पाच्या परिसरात स्मॉग टॉवर उभारण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

या नवीन संसद भवानामध्ये लोकसभेच्या सभागृहाचा आत्ताच्या सभागृहापेक्षा आकार तीन पट मोठा असेल.यांचे काम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे देण्यात आले असून त्याचे डिझाईन एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे.तसेच यामध्ये ८७६ जागांचा लोकसभा,४०० जागांचा राज्यसभा आणि १२२४ जागांचा सेंट्रल हॉल बनवला जाणार आहे.या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च १३ हजार ४५० रुपये इतका असणार आहे.

Exit mobile version