Marathwada Sathi

अमेरिकेत कोरोनामुळे होणार 90,000 जणांचा मृत्यू?

वॉशिंग्टन : गेल्या दहा दिवसांमध्ये अमेरिकेत 2 लाख जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. नव्या वर्षातील पहिल्या दोन आठवड्यात तब्बल 38 हजार नागरिकांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या सर्व काळजीच्या घडामोडीनंतर आणखी एक भीतीदायक इशारा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेनं एक महत्त्वाचा इशारा आहे.‘अमेरिकेत येत्या 3 आठवड्यात सुमारे 90 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, असा इशारा CDC या संस्थेनं दिला आहे. सध्या अमेरिकेतील 1 लाख 30 हजार 300 जण कोरोनामुळे विविध हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. अनेक राज्यात कोरोना पेशंट्सची संख्या दुप्पट झाली आहे.

अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील दोन गोरिलाचे रिपोर्ट चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबऴ उडाली. तर तिसऱ्या गोरिलामध्ये कोरोनाची सर्व लक्षणं आढळून आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्या संपर्कात गोरिला आल्यानं त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version