Marathwada Sathi

भारतामध्ये कोरोना लसीचे दर सर्वात कमी…!

मराठवाडा साथी न्यूज

मंबई : गेल्या वर्षभरापासून पूर्ण जगावर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट आले आहे.मात्र,आता वर्षभरानंतर जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये कोरोनाची लस आली आहे.भारतामध्येही काही दिवसांत लसीकरणास सुरुवात होणार आहे. देशामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशील्ड अशा दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.मात्र,महत्वाची बाब म्हणजे जगभरात दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना लसीचे दर अत्यंत कमी राहणार आहेत.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून कोविशील्डच्या लसीच्या १.१ कोटी मात्रा आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या ५५ लाख मात्र खरेदी करण्यात येत आहेत.कोवॅक्सिनच्या ३८.५ लाख लसींपैकी प्रत्येक लसीवर २९५ रु.चा कर आकारण्यात येणार आहे.भारत बायोटेक १६.५ लाख लसी मोफत उपलब्ध करुन देणार असून कोविशील्डच्या लसीची करासहीतची किंमत २१० रु. असणार आहे.

दरम्यान,फायजर बायोएननटेक मधील एका लसीची किंमत १४३१ रु.असून मॉडर्नाच्या लसीची किंमत २३४८ रु. पासून २७१५ इतपर्यंत आहे.नोवावॅक्स लसीचा दर १११४ रु.आहे, तर स्फूटनिक वी-के लसीची किंमत ७३४ रु.आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची किंमतही ७३४ रु.आहे.अशी माहिती देखील केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

Exit mobile version