Marathwada Sathi

कोरोनाची लस मिळणार ‘मोफत’…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या लसीचे संपूर्ण देशभरात टिकाकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे.दरम्यान,दिल्लीतही या ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ‘गुरु तेग बहादूर सिंग’ या रुग्णालयात आले होते. यावेळी फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात कोरोना लसीचे मोफत वितरण केले जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढे बोलतांना डॉ.हर्षवर्धन असेही म्हणाले की,लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

दरम्यान,कोरोनाची लस मोफत द्यायची की विकत याबद्दल केंद्र सरकारने अजूनही स्पष्टीकरण दिलेले नाही.मात्र,केंद्र सरकारने ही लस मोफत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.

Exit mobile version