Marathwada Sathi

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार नाही लस…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या,कोरोनाचे लक्षणे असलेल्या किंवा प्लाझ्मा घेऊन अजून काही आठवडे पूर्ण न झालेल्यांना कोरोनाची लस देऊ नका,असे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी(१४ जाने.)सर्व राज्यांना दिले आहेत.

दरम्यान,कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून(१६ जाने.)सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणाला लस द्यायची आणि कोणाला नाही,या संदर्भातील सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना दिल्या आहेत. गरोदर महिला, लहान मुले,औषधे-इंजेक्शनची अॅलर्जी-रिअॅक्शन असणाऱ्या व्यक्तींना लस देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.तसेच कोरोनाची लक्षणे असणारे किंवा अन्य आजारांमुळे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणारे, गंभीर आजारी असणाऱ्यांना लस दिली जाणार नाही.काही दिवसांपूर्वीच अतिदक्षता विभागात उपचार झालेले, औषधांची, इंजेक्शनची रिअॅक्शन होत असलेल्यांना लस टोचण्यात येणार नाही.सोबतच जर कोरोना लसीच्या पहिल्या डोसची रिअॅक्शन झाली तर दुसरा डोस देण्यात येणार नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान,हृदय,मेंदू, फुफ्फुस, चयापचय, मूत्रपिंडाशी संबंधित रुग्ण,कॅन्सरसारख्या आजारांचा इतिहास असलेले रुग्ण,कोरोनापासून बचावले रुग्ण,ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे अश्या व्यक्ती,तसेच एचआयव्हीग्रस्त, इम्युनोसप्रेशन औषधे घेणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे.

Exit mobile version