Home आरोग्य कोरोना रुग्णाचा विमानातच मृत्यू…!

कोरोना रुग्णाचा विमानातच मृत्यू…!

970
0

मराठवाडा साथी न्यूज

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.ओर्लांडो,फ्लोरिडाहून लॉस एंजलिसला जाणाऱ्या विमानात ६९ वर्षीय कोरोना पॉसिटीव्ह प्रवास्याचा विमान प्रवासातच मृत्यू झाला यामुळे खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले,त्याशिवाय श्वास घेण्यासही त्यांना त्रास होत होता.त्यामुळे न्यू ओरलियन्समध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करण्यात आले. तेथून या व्यक्तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या प्रवाशाला मृत घोषित केले.त्याच वेळी या व्यक्तिची कोरोना चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते.जवळपास आठवडाभराने अहवाल आल्यानंतर या व्यक्तिला कोरोना असल्याचे समोर आले.

दरम्यान,अमेरिकन प्रशासनाने या विमानातील प्रवाशांची माहिती घेणे सुरू केले आहे.या बरोबरच विमानातील कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here