Marathwada Sathi

“कॉपीराइट फिशिंग स्कॅम”…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : इन्स्टाग्राम या सोशल नेटव्हर्किंगसाईटवर काही दिवसांपासून युजर्सना त्यांनीच केलेल्या पोस्ट या कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या असल्याचे सांगत त्यांना फसविले जात आहे.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युजरचे अकाऊंट हॅक करण्यासाठी हॅकर सर्वप्रथम एखाद्या लोकप्रिय अकाऊंटचा शोध घेतात.त्यानंतर युजरने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्ट क़ॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या असल्याचे सांगण्यात येते.फक्त एव्हढेच नाही तर कॉपीराईट इंफ्रिगमेंट अंतर्गत या युजरवर कारवाईही करण्यात येईल असे सांगून पुढील २४ तांसांत अकाऊंट सस्पेंड केले जाऊ शकते युजर्सच्या मनात भीती निर्माण केली जाते.अश्यावेळीं या फसव्या धमक्यांवर युजर्स विश्वास ठेवतात आणि हॅकर सांगेल तसे करुही लागतात.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार या अशा वेबसाइट्स चे URL (.com) स्वरुपात नसून (.CF)असे दिसते. या वेबसाइट्स इन्स्टाग्रामच्या मूळ वेबसाईट च्या इतक्या सारख्या असतात की कोणालाही ही फसवी वेबसाईट आहे असे वाटतच नाही. अश्या खोट्या पेजच्या माध्यमातून तुमची माहिती, जन्मतारिख, युजर नेम इत्यादी विचारण्यात येते. पुढे युजरने लॉग इन केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती हॅकर कडे जाते.

दरम्यान,सायबर पोलिसांकडून नेटकऱ्यांना सावध राहण्यास सांगितले जात आहे.

Exit mobile version