Home बीड दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात, एमआयएमचा धारुर नगरपालिकेला घेराव

दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात, एमआयएमचा धारुर नगरपालिकेला घेराव

शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये दूषीत पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषीत पाण्यामुळे महिला, बालके, वृद्ध नागरीकांना साथीच्या आजारांना सामोरं जाव लगत असल्याने सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी शहर एमआयएम च्या वतिने धारुर नगर पालिकेला घेरावो घालत मागण्यांचे निवदेन देण्यात आले

44
0

मराठवाडा साथी न्यूज

धारुर: शहरातील वार्ड क्रमांक एकमधील आझाद नगरात नळाच्या पिण्याच्या पाण्यात गटारा प्रमाणे दुर्गंधी येत आहे. नळाला दुषित येत असल्याने रहिवाश्यांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नळाला दुषित पाणी येत असल्यामुळेच सर्दी, खोकला, डेंगू मलेरिया, टायफाईड असे अनेक आजार बळावले आहेत. यासोबतच आझादनगर भागात मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून विजेचे खांब केवळ नावालाच आहेत. पथदिवे कधीच लागत नसल्याने त्या शोभेची वस्तू बनल्या आहेत. आझादनगरच्या रहिवाश्यांनी यापूर्वी नगरपालिकेला अनेकवेळा निवेदन दिले. मात्र, नगरपालिका प्रशासनाने यावर आजवर कोणतीही कारवाई केली नाही. आझाद नगरचे प्रश्न तात्काळ सोडवावे अन्यथा १० नोव्हेंबर पासून नगर परिषदेसमोर एमआयएमच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष मुबिन सहाब, तालुकाध्यक्ष अफरोज पठाण, माजलगाव प्रभारी सिद्धीक, शेख असलम,असेफ, बबलू,आयुब शेख, गुद्दु मकांनदार यांनी निवेदयाद्वारे प्रशासनाला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here