Marathwada Sathi

यंदा काँग्रेस ‘सोनियां’चा वाढदिवस नाही करणार साजरा…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : ना पोस्टर, ना बॅनर, ना कार्यक्रम, ना सेलिब्रेशन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवस यंदा साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तश्या स्वरूपाचे आदेश काँग्रेसने त्यांच्या गाव पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.९) सोनिया गांधींचा वाढ दिवस साजरा केला जाणार नाही.

कोविड आणि शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्या (दि.९) होणारा आपला वाढ दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे, की वाढदिवसाला कुठलेही बॅनर, पोस्टर लावू नका. जेवढी शक्य असेल तेवढी शेतकऱ्यांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसकडून जीवनदान महाभियान रक्तदान शिबिरे आयोजनाचे आवाहन केले आहे.

वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करु नये : बाळासाहेब थोरात
देशात सध्या कोवीड महामारीची परिस्थीती आहे तसेच जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबर रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पाहता सोनिया गांधी यांचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करु नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Exit mobile version