Marathwada Sathi

काँग्रेसचे ‘ सत्याग्रह ‘ ; राष्ट्रपतींना पाठवले निवेदन


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी दि.5 उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घडलेली निंदनीय घटना व इतर घटनेबद्दल न्याय मागण्यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यावतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.

यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दलित समाजाच्या मुलीवर अत्याचार संबंधी दोषीवर त्वरित खटला भरून फाशीची शिक्षा देण्यात यावी.
आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा.
पीडित परिवाराला भेटण्यासाठी जात असलेले मा. खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसाकडून अत्यंत निंदनीय वर्तणूक देण्यात आली या घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्या द्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर एक दिवसीय सत्याग्रह कर्णयात आला. या सत्याग्रहात कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार केशवराव अवताडे , प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, महाराष्ट्र राज्याचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, मा. शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, पक्ष निरीक्षक मुजाहीद खान, मा. आ.सुभाष झांबड, ग्रमिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, रशीद खान मामू ,महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू औताडे, हमद चाऊस, गुलाब पटेल, जी एस ए अंसारी उपस्थीत होते .

Exit mobile version