Marathwada Sathi

“विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे….


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई: पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु होती. बाळासाहेब थोरात यांच्या जागी दुसऱ्या मोठ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याचं सांगितल्या जात आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याची चर्चा होती. बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळलं होतं. पण सोबतच जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो म्हणत सूचक विधान केलं होतं. दरम्यान या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
“विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद बदललं जात असून जी काही नावं आहेत त्यात नाना पटोलेंचं नाव असल्याचं मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्था राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यासंबंधीचा निर्णय काँग्रेसमचे दिल्लीमधील नेते घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version