Marathwada Sathi

पगार न मिळाल्याने ‘Apple’ कंपनीत कर्मचाऱ्यांचा गोंधळ…!

मराठवाडा साथी न्यूज

कर्नाटक : कर्नाटकमधील कोलार जिल्ह्याच्या नरसापूर आद्योगिक क्षेत्रातील ‘अँपल आयफोन’कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे त्यांनी ही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांना मागे पाठविले. काही लोकांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नरसापूरमध्ये तैवानची एक कंपनी विस्ट्रॉन Apple चे आयफोन बनविते.या कंपनीत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला व तेथील काचेचे दरवाजे आणि केबिनही फोडल्या. तसेच उभ्या असलेल्या वाहनांना आणि कंपनीच्या नावाच्या बोर्डालाही आग लावली. ही तोडफोड बराच वेळ सुरु होती. फक्त एव्हडेच नाही तर दगडफेकही करण्यात आली.

दरम्यान,कर्मचाऱ्यांचा संताप पाहून कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांकडून हिंसक झालेल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात आले.कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Exit mobile version